
काँग्रेसची हरयाणातील कार्यकर्ती हिमानी नरवाल हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पोलीस सध्या त्या तरुणाची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान त्या तरुणाने पोलीस चौकशीत काही दावे केले असून त्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणासोबत हिमानीचे नाते होते. ती वेगवेगळ्या कारणांनी त्या तरुणाला ब्लॅकमेल करत होती व त्याच्याकडून लाखो पैसे उकळायची. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हरयाणातील काँग्रेसची कार्यकर्ती हिमानी नरवाल (22) हिचा मृतदेह शनिवारी संपला बस स्टँडजवळ एका सुटकेसमध्ये सापडल्याने खळबळ उडाली होती. हिमानी ही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेशी जोडलेली होती. ती त्यांच्यासोबत श्रीनगर पर्यंत गेली होती.