
जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) झालेल्या गोळीबारात बुधवारी एक जवान जखमी झाला. नौशेरा सेक्टरमधील कलसियान भागात जवान गस्तीवर असताना त्याला सीमेपलीकडून गोळी लागली. सकाळी 6 वाजता ही घटना घडली. जखमी जवानाला उपचारासाठी उधमपूरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. गोळीबाराचे कारण तपासले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.