
सध्या देशभरात सोन्याचे भाव वेगवेगळे आहेत. सोन्या-चांदीचे दर राज्यांतील वेगवेगळे कर आणि अन्य गोष्टींशी संबंधित असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात, शहरात सोन्या-चांदीचे दर भिन्न असतात. मात्र लवकरच संपूर्ण देशात ‘वन नेशन वन रेट’ धोरण लागू होणार असून त्यानंतर सोन्याचा भाव सर्वत्र सारखाच असेल. ‘वन नेशन वन रेट’ ही पेंद्र सरकारने प्रस्तावित केलेली योजना आहे. त्याचा उद्देश देशभरात सोन्याच्या किमतीत एकसमानता आणणे. या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर देशाच्या कोणत्याही भागात सोने खरेदी केल्यास त्याची किंमत सारखीच असेल. या धोरणांतर्गत सरकार नॅशनल बुलियन एक्स्चेंज तयार करेल. जे सर्वत्र सोन्याच्या समान किमती निश्चित करतील आणि ज्वेलर्स समान किमतीला सोने विकतील.
पेट्रोल, डिझेलच्या किमतीप्रमाणे सोन्याच्या किमती दररोज निश्चित केल्या जातात. सध्याच्या काळात सोन्याच्या किमती सराफा बाजाराच्या असोसिएशनमार्फत ठरवल्या जातात. ही किंमत प्रत्येक शहरात वेगवेगळी असते. अंदाजे सराफा बाजारात या किमती सायंकाळी ठरतात. सोन्या-चांदीच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही प्रभाव होतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीचा परिणाम देशांतर्गत किमतीवर होतो.
सोन्याच्या समान किमतीसाठी आणल्या जाणाऱया ‘वन नेशन वन रेट’ धोरणाला जेम्स अँड ज्वेलरी काTन्सिलनेही पाठिंबा दिला. सप्टेंबर 2024 मध्ये होणाऱया बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.