
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदुस्थानात आश्रय घेतला आहे. पण त्यांच्यासोबतच अवामी लीगचे एक लाख समर्थक हिंदुस्थानात आल्याचा दावा बांगलादेश सरकारच्या सल्लागाराने केला आहे. तसेच शेख हसीना यांनी आपल्या आई वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अनेकांचा खुन केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार महफूज आलम म्हणाले की शेख हसीना यांच्यासोबत आवामी लीगचे एक लाख सदस्य हिंदुस्थानात आले आहेत. आलम म्हणाले की आपल्या आई वडिलांचा खूनाचा बदला घेण्यासाठी शेख हसीना यांनी अनेक लोकांना गायब केलं. 2013 ते 2014 दरम्यान देशात सर्वाधिक लोक गायब झाल्याचे आलम यांनी सांगितले. ऐन निवडणुकीत हे लोक गायब केले गेले कारण हसीना यांना निवडणूक प्रक्रियाच नष्ट करायची होती असेही आलम म्हणाले.