ईडी कार्यालय आंदोलन प्रकरण, एकाला अटक, एक दिवसाची कोठडी

शनिवारी फोर्ट येथील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी युथ काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ‘नॅशनल हेरॉल्ड’प्रकरणी काँग्रेस नेत्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. त्याचा विरोध करत शनिवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पण सुट्टी असल्याने कार्यालयात कोणी नव्हते. सुरक्षा रक्षकाने तत्काळ पोलिसांना बोलावल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एकाला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. अन्य आंदोलकांचा पोलीस शोध घेत आहेत.