सौर उर्जेबद्दल आपण ऐकलंय. पण लवकरच हायड्रोजनवर आधारित उर्जेची निर्मिती होणार आहे. अमेरिकेत जगातील पहिले ग्रिड स्केल न्यूक्लियर फ्यूजन वीज प्लांट उभा राहतोय. जर ही योजना कार्यान्वित झाली तर जगात विजेची कमी पडणार नाही. हायड्रोजन आधारित उर्जा ही क्लीन ऊर्जा आहे. सूर्य ज्यापद्धतीने उर्जानिर्मिती करून प्रकाश देतो, अगदी तशाच तंत्राने या प्लँटमधून ऊर्जा निर्मिती होईल.
2030 सालापर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर कार्बन उत्सर्जन न करता वीज निर्माण करणे शक्य होईल. सुरुवातीला या प्लांटमधून 400 मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्टय आहे. त्यातून दीड लाख घरांना वीज मिळू शकते. कॉमनवेल्थ फ्यूजन सिस्टीम नावाच्या कंपनीचे हे स्टार्टअप आहे. क्लीन एनर्जी असे त्याचे नाव आहे. या प्रकल्पात आघाडीची न्यूक्लिअर फ्युजन कंपनी सीएफएस आणि रिचमंड यांनी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे.