केएल राहुल-अथिया शेट्टीनं मुलीचं नाव ठेवलं ‘इवारा’, काय आहे या अनोख्या नावाचा अर्थ, जाणून घ्या…

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटन्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या केएल राहुल याचा आज 33 वा वाढदिवस आहे. याच खास दिनाचे औचित्य साधत राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे नामकरण केले आहे. राहुल आणि अथियाने आपल्या गोंडस मुलीचे नाव इवारा असे ठेवले आहे. सोशल मीडियावर मुलीसोबतचा फोटो शेअर करत दोघांनी ही माहिती दिली.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी आपल्या लाडक्या लेकीसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये केएल राहुलने हातात उचलून घेतल्याचे दिसतंय आणि अथिया तिच्याकडे प्रेमाने बघताने दिसतेय. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये मुलीचे नाव ‘इवारा’ (Evaarah) ठेवल्याचे सांगितले आहे. याचा अर्थ ‘देवाची भेट’ अर्थात ‘गिफ्ट ऑफ गॉड’ असा आहे.

या फोटोवर अनुष्का शर्मा हिनेही कमेंट केली आहे. तिने कमेंटमध्ये हॉर्ट इमोजी शेअर केला असून अभिनेत्री सामंथा हिने तिचाच कित्ता गिरवला आहे. यासह अनेक सेलिब्रिटींनी यावर कमेंट केली आहे. आतापर्यंत जवळपास 5 लाख लोकांनी या फोटोला लाईक केले असून 6 हजारांहून अधिक लोकांनी यावर कमेंट करत या दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

दरम्यान, याआधी 24 मार्च 2025 रोजी केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांना कन्यारत्नाचा लाभ झाला होता. दोघांनीही संयुक्तपणे एक पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली होती. तत्पूर्वी अथियाने बेबी बंपसह काही फोटो शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)