Pet Parents ट्रेंडमुळे चीनसमोर नवे संकट…जाणून घ्या काय आहे समस्या…

चीनमधील लोकसंख्येची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. कारण तेथील लोकं माणसांपेक्षा प्राण्यांना अधिक महत्व देत आहेत.त्यामुळे घटत्या लोकसंख्येच्या संकटाचा सामना करणाऱ्या चीनमध्ये लवकरच मुलांपेक्षा प्राण्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. CNN आणि Goldman Sachs च्या अहवालानुसार, चीन मधील पाळीव प्राण्यांची संख्या या वर्षाच्या अखेरीस चार वर्षांत्या मुलांच्या तुलनेत जास्त होईल. चीनमध्ये जोडपे मुलांना जन्म देण्याऐवजी पाळीव प्राणी पाळण्याकडे भर देत आहेत.

अनेक दशकांपासून सुरु असलेल्या एक कुटुंब एक मूल धोरणामुळे चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे तिथे कामांसाठी लोकांची कमी भासू लागली आहे. अशी माहिती एका अवहालातून देण्यात आली आहे. मुलाचे संगोपन करण्याच्या बाबतीत चीन हा जगातील सर्वात महाग देश आहे. त्यामुळे तेथील लोक मुलांना जन्म न देता प्राण्यांचा मुलांप्रमाणे सांभाळ करतात. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो.  अशी माहिती युथ पॉप्युलेशन रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासात आढळून आली आहे.

2016 साली चीनी सरकारने एक कुटुंब एक मूल असे धोरण आमलात आणले होते. यानंतर लोकसंख्येची टक्केवारी पाहता पु्न्हा 2021 मध्ये नागरिकांना कमीत कमी तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी देण्यासाठी दिली. मात्र तरीही आता चीन सरकार जन्मदर वाढवण्यासाठी धडपड करत आहे. गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे की 2030 पर्यंत, शहरी चीनमधील पाळीव प्राण्यांची लोकसंख्या देशभरात चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपेक्षा जवळपास दुप्पट होईल.हा अंदाज फक्त शहरी भागांसाठी आहे आणि जर ग्रामीण भागांचा समावेश केला तर एकूण पाळीव प्राण्यांची संख्या आणखी जास्त असेल.

गोल्डमन सॅक्सच्या मते, चीनमधील तरुण लोकांमध्ये पाळीव प्राणी पाळण्याची प्रचंड क्रेझ आहे. कौटुंबिक वंश चालू ठेवण्यासाठी तरुण पिढी लग्नाला आणि मुले जन्माला घालण्याला प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे माणसांपेक्षा पाळीव प्राण्यांच्या अन्नाची मागणी झपाट्याने वाढत आहे. 2017 ते 2023 पर्यंत विक्री 16% वाढून $7 अब्जपर्यंत पोहोचली आहे आणि पुढील सहा वर्षांत, चीनमध्ये पाळीव प्राण्यांचे खाद्य $15 अब्ज होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. चीन मधील सध्याच्या लोकसंख्येचा सारासार विचार करता तेथील सरकारने आपला दृष्टिकोन बदलला आहे. लोकांना मुले होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.