ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोमचा घटस्फोट, विवाहबाह्य संबंधांवर स्पष्टच बोलली

ऑलिम्पिक पदक विजेत्या एम. सी. मेरी कोमने अधिकृतरित्या पती करूंग ओंखोलेर यांच्याशी विभक्त होतं असल्याचे जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मेरी कोमच्या घटस्फोटासंदर्भात आणि विवाहबाह्य संबंधांसंदर्भात चर्चा सुरू होत्या. अखेर मेरी कोमने या सर्व चर्चांना पुर्नविराम लावत आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

एम. सी. मेरी कोमने एक्सवर (X) एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तीने एक्सवर एक कायदेशीर नोटीस शेअर केली आहे. नोटीसमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, मेरी कोमचा घटस्फोट दोन्ही कुटुंबांच्या संगनमताने 20 डिसेंबर 2023 रोजी झाला आहे. तसेत ती या धक्यातून सावरली असून मानसिकरित्या ती खूप पुढे गेली आहे. त्याचबरोबर “मेरी कोम बॉक्सिंग फाऊंडेशन”चा चेअरमन हितेश चौधरी याच्या सोबत मेरी कोमचे विवाहबाह्यसंबंध सुरू असल्याची चर्चा सुरू होती. तीने या सर्व चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचे आणि ही फक्त अफवा असल्याच म्हटलं आहे. त्याचबरोबर मीडियाने सुद्धा एखाद्याच्या खासगी आयुष्याचा आदर करावा तसेच चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन तीने मीडियाला केलं आहे. तसेच याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा सुद्धा तीने इशारा दिला आहे.