
गुजरातमधील वृद्ध व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी 68 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
तक्रारदार हे व्यावसायिक असून ते वाकोला परिसरात राहतात. त्याचे वडील आणि आई हे गुजरातला राहतात. तक्रारदार याच्या वडिलांचा कपड्याचा व्यवसाय आहे. ते गुजरात येथून कपडे घेऊन त्याची मुंबईत विक्री करतात. गेल्या आठवड्यात त्यांना त्याच्या आईने फोन केला. त्याचे वडील हे बच्छाव रेल्वे स्थानक येथून एक्सप्रेस पकडून मुंबईत येत होते. तक्रारदार यांच्या वडिलांच्या आत्याचे निधन झाल्याने त्यांना फोन करून पुन्हा घरी येण्यास सांगितले होते. त्यांच्या वडिलांचा फोन बंद येत असल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र ते तिथे भेटले नाहीत.
सोमवारी तक्रारदार यांना त्यांच्या वडिलांच्या मोबाईलवरून फोन आला. माझे अपहरण झाले आहे आणि ते पैसे मागत असल्याचे तक्रारदाराच्या वडिलांनी सांगितले. घडल्याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
फोनवरून आरोपींनी धमकी दिली की, तुझ्या वडिलांनी आपले 68 लाख रुपये घेतले आहेत. जर ते पैसे दिले नाही तर चाकूने हल्ला करू. त्यानंतर दुपारी त्यांना आणखी एका अंगडियाच्या नावाने मोबाईलवर मेसेज आला. त्याने रात्री मोबाईलवर फोन करून तुझ्या वडिलांनी पैसे घेतले आहेत, आता खूप फिरवले आहे, जर 25 लाख रुपये अंगडियाकडे द्यावे असे सांगून शिवीगाळ केली.