लक्षवेधक वृत्त – आला ओलाचा मॅप, ओला कॅबने स्वतःचा नकाशा केला लॉन्च

आला ओलाचा मॅप

ऑनलाइन कॅब सेवा देणारी कंपनी ओलाने आता नेव्हिगेशनसाठी गुगल मॅपची मदत घेणार नसल्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्वतःचा विकसित मॅप प्लॅटफॉर्म ओला मॅप्सवर शिप्ट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ओला कॅबने स्वतःचा नकाशा लॉँच केला असून त्याला ओला मॅप्स असे नाव दिले आहे.

सुरतमध्ये इमारत कोसळून सहा जण मृत्यूमुखी

सुरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. ढिगारा उपसण्याचे काम सुरु असून आणखी काही लोक ढिगाऱयाखाली अडकले असण्याची शक्यता आहे. ही इमारत 2017 मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत एकूण 32 कुटुंबे होती. इमारतीत राहाणारे अनेक लोक भाडेतत्वावर राहत होते. बहुतांश लोक मोलमजुरीचे काम करणारे होते.

‘टायटॅनिक’चे निर्माते जॉन लँडो यांचे निधन

‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार’ सिनेमाचे निर्माते जॉन लँडो यांचे पॅन्सरने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांची मुलगी जेमी लँडोने ही माहिती दिली. त्यांच्या निधनाने हॉलीवूडवर शोककळा पसरली. 1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘टायटॅनिक’ चित्रपटामुळे जॉन लँडो यांचे नाव चर्चेत आले. जेम्स पॅमरून यांचे ते सहकारी निर्माते होते. पॅमरून आणि लँडो यांच्यामुळे
‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि तीन ऑस्कर नामांकने जिंकली होती.

सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला

अंतराळात अडकून पडलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या परतीबद्दल नासाने महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. सुनीता विल्यम्स यांच्या परतीची तारीख आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंतराळयानाची स्थिती चांगली असून ते अधिक काळ कार्यरत राहू शकते, असे नासाने म्हटले आहे. सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर हे दोघे बोईंग स्टारलायनर यानातून 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले आहेत. यानामध्ये हेलियम गळतीची समस्या उद्भवल्याने दोघे अंतराळवीर तिथेच अडकून पडले आहेत.

हॅकरने चोरले ‘एआय’चे डिझाईन

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संदर्भातील आघाडीची पंपनी ‘ओपनएआय’सोबत नुकताच एक गंभीर सायबर गुन्हा घडला. ‘ओपनएआय’च्या डिझाईनची चोरी झाली आहे. त्यासाठी हॅकरने कंपनीची अंतर्गत संदेश प्रणाली हॅक केली. हा सायबर हल्ला करणाऱयाने कंपनीच्या कर्मचाऱयांच्या ऑनलाईन चर्चा पह्रममधून ही माहिती मिळवली आहे. या चर्चेत ‘ओपनएआय’च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा केली जात होती. या सायबर हल्ल्याची माहिती ‘ओपनएआय’ने सार्वजनिकपणे दिलेली नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही माहिती फक्त अंतर्गत चर्चेपुरती मर्यादित होती. त्यामध्ये ग्राहकांची किंवा सहयोगी कंपन्यांची कोणतीही गोपनीय माहिती समाविष्ट नव्हती. हा हल्ला करणारा स्वतंत्र गुन्हेगार असल्याचे समजते.