ओला इलेक्ट्रिक कंपनीत पुन्हा कर्मचारी कपात

ओला इलेक्ट्रिक कंपनी पुन्हा एकदा 1 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. हे कर्मचारी कंत्राटी पदावर कार्यरत आहेत. कंपनीतील खरेदी, पूर्तता, ग्राहक संबंध आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अशा अनेक विभागांमध्ये ही कर्मचारी कपात केली जात आहे. कंपनीला तोटा सहन करावा लागल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने पाच महिन्यांपूर्वीच कर्मचारी कपात केली होती. त्या वेळी कंपनीने 500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते. खर्च कमी करण्यासाठी कंपनी त्यांचे लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरी मॉडेल बदलत आहे. ग्राहकांच्या तक्रारी, पुरवठादारांमधील वाद आणि घटत्या विक्रीमुळे ओलाच्या अडचणीत भर पडली आहे.