इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ओला रोडस्टर लाँच केली आहे. या बाईकमध्ये तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये रोडस्टर, रोडस्टर एक्स आणि रोडस्टर प्रो अशा एकूण तीन व्हेरियंटमध्ये ही बाईक लाँच करण्यात आली आहे. हे तीनही प्रकार वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यामधील बेसिक मॉडेलची म्हणजेच ‘Ola Roadster X’ ची किंमत 74,999 रूपये इतकी असणार आहे. हे तिन्ही मॉडेल 2.5kWh, 3.5kWh आणि 4.5kWh अशा तीन बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यांची किंमत अंदाजे 74,999 रूपये, 84,999 रूपये आणि 99,999 रूपये अशी असणार आहे.
तर ‘Ola Roadster’ 3kWh, 4.5kWh आणि 6kWh अशा तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत अंदाजे 1,04,999 रूपये, 1,19,999 रूपये, आणि 1,39,999 रूपये अशी असणार आहे.
याव्यतिरिक्त कंपनीने 8kWh आणि 16kWh अशा बॅटरी पॅकसह Roaster Pro हा प्रकार सादर केला आहे. ज्यांची किंमत अंदाजे 1,99,999 रूपये आणि 2,49,999 रूपये अशा असणार आहेत.
बॅटरी क्षमता आणि किमतींव्यतिरिक्त, रोडस्टर एक्स आणि रोडस्टर या दोन्ही प्रकारांचे स्वरूप आणि डिझाइन बऱ्यापैकी सारखे आहेत. मात्र ‘रोडस्टर प्रो’ च्या मॉडेलमध्ये 124km/hour एवढा टॉप स्पीड देण्यात आला आहे. तर 6kWh या प्रकारात एका चार्जमध्ये 248 किमीची ड्रायव्हिंग रेंज देण्यात आली असून त्याचा टॉप स्पीड 126km/hour इतका असणार आहे.
रोडस्टर प्रो हे कंपनीचे टॉप मॉडेल असून त्याची किंमत देखील सर्वात जास्त आहे. यामध्ये 16kWh बॅटरी पॅकसह एका चार्जमध्ये 579 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यात आली आहे. या बाईकमध्ये 52kWh ची मोटर बसविण्यात आली असून जी 105Nm टॉर्क जनरेट करते. तिचा टॉप स्पीड 194km/hour असा आहे. सामान्यत: कोणत्याही पेट्रोल बाईकपेक्षा खूप चांगला आहे.
यासोबतच रोडस्टर एक्समध्ये कंपनीने, स्पोर्ट्स, नॉर्मल आणि इको असे तीन रायडिंग मोड दिले आहेत. यामध्ये 4.3 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला असून तो MoveOs वर चालतो. Ola Maps Navigation, क्रूझ कंट्रोल, डीआयवाय मोड, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ओटीए अपडेट सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ओला इलेक्ट्रिकच्या स्मार्टफोन अॅपवरूनही ही बाईक ऑपरेट करता येणार आहे.
या सर्व बाईकचे बुकिंग अधिकृतपणे सुरू झाले आहे. सर्व बाईक ओलाच्या अधिकृत वेबसाइट वरून बुक करता येणार आहेत.