Odisha Train Accident : कामाख्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले

ओडीशात पुन्हा एकदा एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. बंगळुरूवरून ओडीशाला जाणाऱ्या कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले आहे. सध्या एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू झाले आहे. अद्याप या दुर्घटनेत कुणी जखमी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.