सरोगसी माध्यमातून आई झालेल्या महिला कर्मचाऱयाला अन्य महिलांप्रमाणे प्रसूती रजा (मॅटर्निटी लिव्ह) आणि इतर लाभ मिळण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय ओडिशा उच्च न्यायालयाने दिला. न्यायाधीश एसके पाणिग्रही यांच्या एकल खंडपीठाने 25 जून रोजी ओडिशा वित्त सेवेच्या महिला अधिकारी सुप्रिया जेना यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दिला.जर सरकार एखाद्या दत्तक मातेला प्रसूती रजा देत असेल तर एखाद्या महिलेने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला असेल तर तिला मातृत्व राजा नाकारणे हे अन्यायकारक ठरू शकेल. असे उच्च न्यायालयाने म्हटले.