ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यामध्ये धावत्या ट्रेनवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अचानक झालेल्या गोळीबारीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. सदर घटना चारम्पा स्थानकाच्या जवळपास घडली असून त्याचा तपास GRP ने सुरू केला आहे.
#WATCH | Odisha | Shots were fired at Puri-Anand Vihar Nandankanan Express train near Bhadrak this morning; Police investigation underway pic.twitter.com/6JN5ZSfK6A
— ANI (@ANI) November 5, 2024
ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना मंगळवारी (05 नोव्हेंबर 2024) सकाळी ओडिशा राज्यातील भद्रक-बौदपूर दरम्यान 9.30 च्या सुमारास घडली. दिल्लीच्या आनंद विहारहून नंदन कानन एक्सप्रेस पुरीला जात होती. 9.25 ला नंदन कानन एक्सप्रेस (12816) भद्रक रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. त्यानंतर पाचच मिनिटांमध्ये गाडीवर गोळीबार झाला. सदर घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. तसेच रेल्वे पोलिसांनी सुरक्षितपणे गाडी पुरी रेल्वे स्थानकापर्यंत पोहचवली. सदर घटनेचा तपास रेल्वे पोलीस आणि GRP च्या माध्यमातून सुरू आहे.