ओबीसी समाज आक्रमक; मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून केला निषेध

जालना जिल्ह्यातील परतूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून प्रतिमेला चपलचे जोडे मारून ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. परतूरमध्ये भाजप-शिंदे-पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. सरकारने मराठा समाजाला ओबीसींना मिळणाऱ्या सवलती देण्याचा निर्णय घेतल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.

गेल्या कित्येक दिवसापासून मराठा आरक्षणाची लढाई ही राज्यामध्ये सुरू होती. ओबीसींचे सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये प्रति मोर्चे काढण्यात आले होते. परंतु सरकारने ओबीसींच्या ताटातील घास काढून दिल्याने शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपात कार्यरत असणाऱ्या परतूर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या विविध राजकीय पदाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत निषेध व्यक्त केला.

राजकीय पदाचा राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नंदकुमार दगडूबा गांजे (ओबीसी मोर्चा भाजपा तालुकाध्यक्ष, परतूर), विलास तुकाराम चव्हाण (जिल्हा सचिव, भाजपा), भागवत काकडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, जालना), रामप्रसाद किसनराव थोरात (भाजपा तालुका सरचिटणीस, परतूर), प्रवीण सुधाकर सातोनकर (भाजपा शहराध्यक्ष परतूर), योगेश गणेश भले (भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जालना), सिद्धेश्वर मुरलीधर केकान (भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष परतुर), राहुल अंकुशराव काळे (भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष परतूर), बाबासाहेब महादेव टोणपे (भाजपा सरचिटणीस, परतूर), महादेव बबनराव वाघमारे (भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष, जालना), अर्जुन राठोड (भाजपा सरचिटणीस),अंकुश आडे (काँग्रेस ओबीसी सेल, परतूर), इंद्रजीत घनवट (ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष), केशव काळदाते (राष्ट्रवादी युवक सचिव, परतूर), राजेभाऊ आघाव (अजित पवार गट), शिवाजी तरवटे (शिंदे गट वैद्यकीय सहायता निधी अध्यक्ष, परतूर, मंठा विधानसभा) यांचा समावेश आहे.