Oats- ओटस् फक्त खाऊ नका, चेहऱ्यावरही लावा! वाचा ओटस् सौंदर्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

आपला चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो. म्हणूनच चेहरा सुंदर असावा याकरता स्त्रियांसोबत पुरुषही आता सज्ज झालेले आहेत. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी म्हणून आपण अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरतो. परंतु अशा सौंदर्यप्रसाधनांमुळे आपला खिसा हलका होतो आणि त्याचा हवा तसा रिझल्टही मिळत नाही. म्हणूनच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी याकरता घरातील ओटस् खूप गुणकारी ठरणार आहेत. नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी आपण ओट्स आणि दह्याचा वापर करु शकतो. ओट्स आपल्या चेहऱ्याची खोलवर साफसफाई करण्यास मदत करतात. तसेच त्वचेची समस्या कमी करण्यासाठी दही हे खूपच प्रभावी मानले जाते.

 

 

ओट्स आणि दह्याचा वापर करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कशी मिळवाल?

सर्वात आधी आपला चेहरा दह्याने स्वच्छ करावा लागेल. एका भांड्यात 2 चमचे घट्ट दही घ्या. याने चेहऱ्याला हलके मसाज करा. कमीत कमी दोन मिनिटे मालिश करायला विसरू नका. यानंतर, साध्या पाण्याने चेहरा धुवा.

 

चेहरा धुतल्यानंतर आपण दही आणि साखरेचा स्क्रब बनवायचा आहे. याकरता एका भांड्यात 2 चमचे ओट्स घ्या. त्यात काही साखरेचे दाणे घाला. थोडे दही घाला आणि 3 ते 4 मिनिटे चांगले मसाज करा. ओट्स आणि साखरेमध्ये असलेले बारीक कण त्वचेला खोलवर स्वच्छ करतात. यामुळे त्वचा चांगली स्वच्छ होते आणि चेहराही उजळतो.

 

स्क्रबिंगनंतर तिसरी पायरी म्हणजे मसाज. यासाठी तुम्ही पपईची क्रीम बनवू शकता. क्रीम बनवण्यासाठी एका भांड्यात 3 चमचे पपई प्युरी घ्या. आता त्यात 1चमचा बारीक वाटलेली ओट्स पावडर घ्या. त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. तुम्हाला याने तुमच्या चेहऱ्याला किमान 10 ते 15 मिनिटे मसाज करावा लागेल. ते सुकल्यानंतर, साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि फरक पहा.

 

सर्वात शेवटी तुम्हाला ओट्स आणि दह्याचा फेस मास्क वापरावा लागेल. तुम्ही ते आठवड्यातून 3 ते 4 वेळा लावू शकता. फेस मास्क बनवण्यासाठी, एका भांड्यात थोडे दही घ्या. त्यात 2 चमचे ओट्स पावडर आणि थोडे मध घाला. त्याची पेस्ट बनवा आणि ती चेहरा आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटे तसेच ठेवा.

 

फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावर हलके मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. यामुळे तुमची त्वचा कोरडी होणार नाही. जर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचे नसेल तर तुम्ही अ‍ॅलोवेरा जेल देखील लावू शकता.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)