
ओट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. पण त्यात असे अनेक गुणधर्म आहेत जे तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या सोडवू शकतात. ओट्समधील अनेक गुणधर्म आपल्याला दिवसभर उर्जा देतात. तसेच ओट्स केवळ आरोग्यासाठीच नाही तर, त्वचेसाठीही खूप उपयुक्त मानले जातात. ओट्समध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेला मुरुमांपासून खाज सुटण्यापर्यंतच्या सर्व समस्यांपासून आराम देतात.
आपली त्वचा अनेकदा काळी पडू लागते, त्वचा काळी पडू लागणं म्हणजे आपल्या त्वचेतील मेलेनिनची पातळी असंतुलित होत असते. ओट्स हे व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्रोत आहे जे मेलेनिन संतुलित करते आणि काळ्या त्वचेला गोरे बनवते. हे वापरण्यासाठी, एक चमचा मध आणि एक चमचा ओट्सचे पीठ लागेल. दोन्ही गोष्टी नीट मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावावी. हा पॅक सुकल्यानंतर, कोमट पाण्याने धुवावा. दररोज असे केल्याने त्वचेचा रंग पुन्हा गोरा होऊ लागेल.
ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे त्वचेला मुरुमांपासून वाचवतात. ते वापरण्यासाठी, प्रथम दोन चमचे ओट्स, एक चमचा बेकिंग सोडा आणि पाणी घ्या. आता ओट्स बारीक करा आणि त्यात बेकिंग सोडा आणि पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट मानेपासून चेहऱ्यापर्यंत संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. सुकल्यानंतर, थंड पाण्याने तोंड धुवा.
त्वचा कोरडी असेल तर खाज सुटण्याची समस्या उद्भवते. पण ओट्स वापरून या समस्येचा सामना करू शकता. ओट्समध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेला बॅक्टेरियापासून वाचवतात आणि खाज सुटण्याच्या समस्येपासून आराम देतात. याकरता, अर्धा कप ओट्स, एक अंडे, एक मॅश केलेले केळे, एक चमचा मध आणि एक चमचा बदाम तेल लागेल. या सर्व गोष्टी मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. सुकल्यानंतर, कोमट पाण्याने तोंड धुवावे.
ओट्स त्वचेला चांगले मॉइश्चरायझ करतात. यासाठी, सर्वप्रथम एका लिंबाचा रस, एक चमचा मध आणि एक चमचा ओट्सची आवश्यकता असेल. तिन्ही गोष्टी एकत्र करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ते सुकू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.
ओट्स त्वचा स्वच्छ करते, म्हणून क्लिंजर म्हणून देखील वापरतात. यासाठी, एक कप ओट्समध्ये काही थेंब लैव्हेंडर तेल मिसळा आणि त्याद्वारे त्वचा स्वच्छ करा. ते काही काळ त्वचेवर राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)