रशिया-युक्रेन युद्धाची सर्वात खळबळजनक बातमी सध्या समोर येत आहे. मॉस्कोमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात रशियाचा न्यूक्लियर चीफ ठार झाल्याच्या वृत्ताने क्रेमलिनपासून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी मॉस्कोमध्ये घडली. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॉम्ब लपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेवरून ब्रिटनने रशियाला घेरण्याचा प्रयत्न केला. किरिलोव्ह हे क्रेमलिनचे मुखपत्र बनल्याचा आरोप ब्रिटनने केला होता. रशियाच्या अण्वस्त्र, जैविक आणि रासायनिक सुरक्षा दलांचे प्रमुख लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह हे रियाझान्स्की प्रॉस्पेक्ट येथील अपार्टमेंट इमारतीबाहेर झालेल्या स्फोटात ठार झाले.
रशियन टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये एका इमारतीचे उध्वस्त प्रवेशद्वार आणि दोन मृतदेह रक्ताने माखलेल्या बर्फात पडलेले दिसत आहे. रॉयटर्सच्या फुटेजमध्ये घटनास्थळी पोलिसांचा घेरा दिसत आहे. हा दहशतवादी हल्ला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.