दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदावर एनएसयूआयचा कब्जा

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत काँग्रेसप्रणीत एनएसयूआय अर्थात नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाने जबरदस्त यश मिळवले. तब्बल 8 वर्षांनी एनएसयूआयने भाजपप्रणीत एबीव्हीपीचे अध्यक्ष पदावरील वर्चस्व मोडीत काढले. भाजपाच्या हिमंता बिस्वा सरमा, तेजस्वी सूर्या यांसारख्या दिग्गज नेत्यांनी एबीव्हीपीसाठी प्रचार केला. परंतु हा प्रचार कुचकामी ठरला. एनएसयूआयच्या विजयाच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

एनएसयूआयने दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियन इलेक्शन्सचे अध्यक्ष रौनक खत्री डुसू असणार आहेत. या विजयानंतर एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी जल्लोष केला. या निवडणुकीत 4-0ची अपेक्षा होती. परंतु एनएसयूआयने अध्यक्ष आणि संयुक्त सचिव ही दोन्ही पदे जिंकली. या दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियन इलेक्शन्सचे निकाल हरयाणा निवडणुकीआधीच लागणार होते. परंतु विद्यापीठाने षडयंत्र रचले. त्यामुळे निकालाला इतका उशीर झाला, असा आरोप चौधरी यांनी केला.