
मीरा-भाईंदर युवासेना चषकावर विरार-कर्नाळा येथील एनपी स्पोर्ट्सने आपले नाव कोरले. युवासेनेने आयोजित केलेल्या युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला क्रिकेट संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑल इंडिया युवा मंचचे अध्यक्ष श्याम शिंदे यांच्या हस्ते हा चषक एनपी स्पोर्ट्सच्या संघाने स्वीकारला.
भाईंदर येथील भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदानावर भाईंदर पूर्वचे शिवसेना शहर सचिव ऋषिकेश उभे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एनपी स्पोर्ट्स संघ विजेता ठरला. यावेळी भाईंदर पूर्वचे शहर सचिव ऋषिकेश उभे, ओवळा-माजिवडा विधानसभा डीजी समन्वयक मयूर भोईर, शहर अधिकारी – भाईंदर पूर्वचे सल्लागार स्टिव्हन कार्डोझा, समाजसेवक उदय पाटील, जिल्हा अधिकारी- युवासेना दीपेश गावंड, उपजिल्हाप्रमुख भाईंदर धनेश पाटील, मीरा-भाईंदर विधानसभा समन्वयक मनोज मयेकर, उपशहरप्रमुख तानाजी कळमकर, विभागप्रमुख हुकूमचंद अग्रवाल, पाचगणी, महाबळेश्वर संपर्कप्रमुख अमित देशमुख उपस्थित होते.