आता सिलेक्टिव ग्रुप कॉलिंग करता येणार, व्हॉट्सअ‍ॅपने आणले नवीन फीचर

व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवनवीन फीचर आणत आहे. जगभरात 3 अब्जांहून अधिक युजर्स असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने नवीन फीचर्स आणले आहेत. यामध्ये सिलेक्टिव ग्रुप कॉलिंग यासारख्या सुविधेचा समावेश आहे.

व्हिडीओ कॉलमध्ये मजेशीर इफेक्ट्स

व्हिडीओ कॉलिंग अधिक इंटरेक्टिव्ह बनवण्यासाठी स्नॅपचॅटसारखे मजेशीर इफेक्ट्स वापरता येतील. तसेच पार्श्वभूमी बदलण्याचे पर्याय व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी उपलब्ध करून दिले आहेत.

डेस्कटॉप कॉलिंग अधिक सोपे

डेस्कटॉपवरून कॉल करणे अधिक सोपे झाले आहे. लॉगिन केल्यानंतर थेट कॉल सुरू करण्याचा, कॉल लिंक तयार करण्याचा किंवा नंतर नंबर डायल करण्याचा पर्याय युजरला दिसेल.

सिलेक्टिव ग्रुप कॉलिंग

ग्रुप चॅटमधून कॉल करताना आता संपूर्ण ग्रुपऐवजी फक्त काही निवडक व्यक्तींना कॉल करू शकता. त्यामुळे आपल्या गरजेनुसार मोजक्या लोकांशी संवाद साधता येईल.