आता एकाच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वापरा दोन नंबर!

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खुशखबर आहे. कारण आता एकाच व्हॉट्सअ‍ॅपवर दोन मोबाईल नंबर वापरता येणार आहेत. युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फिचर घेऊन येते. आता एकाच व्हॉट्सअ‍ॅपवर दोन नंबर वापरण्याची सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर येतेय. याआधी वेगवेगळ्या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी ड्युअल अ‍ॅप किंवा क्लोन अ‍ॅपचा वापर करावा लागायचा किंवा पर्याय म्हणून लोक बिझनेस व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. मात्र यापुढे ही गोष्ट एकदम सोपी होणार आहे.

दुसऱ्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट्सच्या सेट अ‍ॅपची प्रक्रिया एकदम सोपी आहे. यासाठी तुमच्याकडे दुसरा मोबाईल नंबर किंवा सिमकार्ड असणे गरजेचे आहे. सिममध्ये मल्टिसिम किंवा ई-सिमची सुविधा असली तरी चालेल. सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जा आणि तुमच्या नावाच्या बाजूला असलेल्या बाणावर टॅप करा. आता अ‍ॅड अकाऊंटची निवड करा. त्यानंतर तुमच्या दुसऱ्या अकाऊंटची सेटअप प्रक्रिया पूर्ण करा.