पाच लाखांपर्यंत यूपीआय पेमेंट!

सध्याच्या काळात आपण जास्त रोकड जवळ बाळगत नाही. आपण यूपीआयने अधिक प्रमाणात पेमेंट करतो. यूपीआयने पेमेंट करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता यूपीआयवर पाच लाखांपर्यंतचे पेमेंट आपल्याला करता येणार आहे. 16 सप्टेंबरपासून हा नियम लागू झाला आहे. खासकरून कराचा भरणा करण्यासाठी यूपीआय पेमेंटची मर्यादा वाढवण्याचे निर्देश एनपीसीआयने दिले आहेत.

एनपीसीआयने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, यूपीआयमध्ये विशिष्ट श्रेणींसाठी प्रतिव्यवहार मर्यादा वाढवण्याची आवश्यकता बऱ्याच दिवसांपासून जाणवत होती. हे लक्षात घेता एनपीसीआयने सर्व बँका, पेमेंट सर्व्हिस प्रोवायडर आणि यूपीआय अॅप्सना ऑनलाइन पेमेंटसाठी काही ठरावीक श्रेणींमध्ये व्यवहार मर्यादा वाढवली आहे. तसेच त्यासंबंधी निर्देश दिले आहे.

यासाठी करा पेमेंट

16 सप्टेंबरपासून यूपीआय वापरकर्ते एकावेळी पाच लाख रुपये ट्रान्सफर करू शकतील. कर भरणा, रुग्णालयाचे बिल, शैक्षणिक सेवा आणि आयपीओ यासाठी एकावेळी पाच लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल. यामुळे रुग्णालयाचे तत्काळ बिल भरता येऊ शकते. तसेच शैक्षणिक संस्थेमध्ये पैसे पाच लाखांपर्यंत पैसे भरणेही सहज शक्य होणार आहे.

डिजिटल व्यवहार वाढले

सरकारकडून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे. दिवसेंदिवस यूपीआयद्वारे होणारे व्यवहारही वाढत आहे. अगदी सामान्य भाजी विव्रेत्यापासून मोठ्या शो रूमपर्यंत तुम्ही यूपीआय पेंमेंट करू शकता. यामुळे रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत.