
चारधामसाठी जाणाऱ्या भाविकांना आता थेट हेलिकॉप्टरने चारधाम दर्शन घेता येणार आहे. हेलिकॉप्टरची सेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. यमुनोत्री आणि गंगोत्री धाममध्ये हेलिपॅड तयार झाले आहेत, तर बद्रीनाथमध्ये आधीपासूनच हेलिपॅड तयार आहे. तीनही नवीन हेलिपॅडचे सर्वेक्षण आणि सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे. उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामसाठी आधीच हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध होती.
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती आणि हेली शटल सेवा कंपन्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याची माहिती देण्यात आली. याचा प्रस्ताव उत्तराखंड नागरी उड्डयन विकास प्राधिकरणाला (युकाडा) पाठवण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर भाविक चारही धामांसाठी हेलिकॉप्टर सेवा बुक करू शकतील. सध्या केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर सेवा बुकिंग 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होत आहे. यंदा भाडे सुमारे 5 टक्क्यांनी वाढले आहे. संभाव्य भाडे सिरसीहून 6061 रुपये तर फाटाहून 6063 रुपये आणि गुप्तकाशीहून 8533 रुपये प्रति प्रवासी असणार आहे.
2 मे रोजी कपाट उघडणार
केदारनाथ धामचे कपाट येत्या 2 मे रोजी उघडणार आहेत. त्याच दिवशी गुप्तकाशी, सिरसी आणि फाटा या ठिकाणाहून केदारनाथ धामसाठी हेलीकॉप्टर सेवा सुरू होईल. युकाडाने आयआरसीटीसीला यात्रा नोंदणीचा डेटा पाठवला आहे.