आता FASTag नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल, वाचा काय आहे नवीन नियम

fastag-toll-plaza

सरकारने टोल प्लाझावरची गर्दी कमी करण्यासाठी FASTag सुरू केले. मात्र अद्यापही अनेक वाहनचालक FASTag लावत नसल्याचे दिसून आळे आहे. त्यामुळे अनेकदा टोलप्लाझावर गोंधळ उडतो व इतर वाहानांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक नवा नियम बनवला असून या पुढे FASTag नसलेल्या गाड्यांना दुपट्ट टोल भरावा लागणार आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) लागू केलेल्या नव्या नियमानुसार, आता प्रत्येक वाहनाधारकाला समोरच्या विंडशील्डला FASTag जोडणे बंधनकारक आहे. ज्यांच्या वाहनावर FASTag योग्य प्रकारे लावलेला नसेल अशा वाहनचालकांच्या खिशाला आता फटका बसणार आहे.

जीपीएस प्रणाली आणणार

केंद्र सरकार लवकरच सॅटेलाईटवर आधारीत इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन देशभरात सुरू करणार असल्याचे समजते. सर्वात आधी व्यावसायिक वाहनांसाठी ही यंत्रणा राबवण्यात येणार आहे. त्यानंतर खासकी वाहने, जीप आणि मोठय़ा वाहनांसाठी ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. ही यंत्रणा कशा पद्धतीने आणि कधी राबवता येईल याची चाचपणी सुरू असल्याचे पेंद्र सरकारने म्हटले आहे.