न खेळताच जोकोविच उपांत्य फेरीत

आपल्या विक्रमी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदासमीप असलेला नोव्हाक जोकोविच उपांत्यपूर्व सामन्यात अॅलेक्स डिमिनोरविरुद्ध न खेळताच उपांत्य फेरीत पोहोचला. डिमिनोरने आपल्या दुखापतीमुळे सामन्याच्या एक तास आधीच माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जोकोविच 13 व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचला. सोमवारी झालेल्या चौथ्या फेरीच्या सामन्यात आर्थर फिल्सविरुद्ध 6-2, 6-4, 6-4, 6-3 असा विजय नोंदविताना त्याने व्रॅकचा आवाज ऐकला होता. तेव्हाच तो सावधतेने नेटपर्यंत पोहोचला होता. पण त्याने पत्रकारांशी बोलताना आपल्या वेदना लपवल्या होत्या. मात्र आज त्याने अत्यंत दुखद अंतःकरणाने आपण माघार घेत असल्याचे सांगितले. आता जोकोचा उपांत्य सामना टेलर प्रिट्ज आणि लोरंझो मुसेटी यांच्यातील विजेत्या खेळाडूशी होईल. 24 ग्रॅण्डस्लॅम विजेत्या जोकोविचने आतापर्यंत सात विम्बल्डन जेतेपदे जिंकली आहेत.