लोणंदमधील अवैध होर्डिंग्ज 24 तासांत काढावेत! नगरपंचायतीचा अल्टिमेटम; पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई

सद्यस्थितीत कादळी काऱयामुळे होर्डिंग्ज बोर्ड पडून जीकितहानी होण्याच्या घटना घडत आहेत. त्या अनुषंगाने लोणंद नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत व विनापराना उभे केलेले होर्डिंग्ज 24 तासांच्या आत संबंधितांनी काढावेत; अन्यथा पोलीस बंदोबस्तात हे अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यात येतील, असा इशारा लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायककाड यांनी दिला आहे.

लोणंद शहरामध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जधारकांना लोणंद नगरपंचायतीमार्फत नोटीस दिली आहे. संबंधित होर्डिंग्जधारकांनी दिलेल्या मुदतीत होर्डिंग्ज काढून घ्यावीत; अन्यथा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याचे समजून संबंधितांकर गुन्हे दाखल केले जातील. संबंधित होर्डिंग्ज शुक्रकार दि. 31 मे रोजी पोलीस बंदोबस्तात नगरपंचायत प्रशासनाकडून काढण्यात येणार आहेत. याकामी नगरपंचायतीस झालेला खर्च संबंधिताकडून कसूल केला जाऊन संबंधित होर्डिंग्ज जप्त करण्यात येणार आहेत.

लोणंद शहरातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानांपुढे विना परवाना फ्लेक्स बोर्ड तसेच छोटे होर्डिंग्ज विनापरवाना लावले असून, हे फ्लेक्स, बोर्ड तसेच छोटी होर्डिंग्ज तत्काळ स्कखर्चाने काढून घ्यावीत, असेही आवाहन मुख्याधिकारी गायककाड यांनी केले आहे.