लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ला पसंती कमी

निवडणुकीच्या प्रचारात परस्परांच्या विरोधात होणारे आरोप-प्रत्यारोप, उमेदवारी मिळवण्यासाठी एका पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱया पक्षात प्रवेश, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी होणारा पैशाचा वापर यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नाराजी निर्माण होते. परिणामी नोटाला मतदान करण्याचा पर्याय जागरुक मतदार निवडतात, पण लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात तुलनेत कमी मतदारांनी नोटाच्या बटणाचा पर्याय स्वीकारला असल्याचे मतदानाच्या आकेडवारीवरून दिसून आले आहे.

मुंबई शहरात 13 लाख 39 हजार 299 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर मुंबई दोन्ही उपनगरातील 43 लाख 34 हजार 513 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक विभागाकडील आकडेवारीनुसार 1.24 टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांत 46.06 टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत 75 हजार 262 मतदारांनी नोटाचे बटण दाबले होते. म्हणजे 1.40 टक्के नोटाला मतदान झाले होते.

निवडणूक रिंगणात असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार मतदाराला आवडत नसले तर अशा मतदारांनासाठी निवडणूक आयोगाने नोटाच्या बटणाचा पर्याय दिला आहे. नोटा म्हणजे ‘नन ऑफ दी अबाऊव्ह’ असा अर्थ होतो. ईव्हीएमवर सर्व उमेदवारांचे नाव व पक्ष चिन्हाच्या खाली नोटाच्या बटणाचा पर्याय असतो. 2009 मध्ये निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला नोटाचा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर  नागरी हक्क संघटना पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज या स्वयंसेवी संघटनेने नोटाचे समर्थन करणारी जनहित याचिका 2013 मध्ये न्यायालयात दाखल केली. त्यानंतर 2013मध्ये न्यायालयाने मतदारांना नोटाला पर्याय देण्याचे आदेश दिले. त्यानंतर ईव्हीएममध्ये नोटाच्या बटणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला.

विधानसभा मतदारसंघ आणि नोटाला पडलेली मते

अणुशक्तीनगर     –            3884

सायन कोळीवाडा            –           1980

मलबार हिल – 2015

कुलाबा          – 1193

मुंबादेवी        – 1113

चारकोप        – 2313

बोरिवली       – 3637

कांदिवली पू. – 2163

मालाड प.     – 1502

चांदिवली      – 2247

कुर्ला             – 1594

कलिना          – 1667

मुलुंड            – 3834

भांडुप           – 2406

विक्रोळी        – 1709

घाटकोपर पू. – 1719

घाटकोपर प. – 1387

चेंबूर             – 2018

मानखुर्द शिवाजी नगर      –           130

माहीम                 – 1553

वडाळा                 – 1708

धारावी                – 1756

वरळी                  – 1562

भायखळा              – 1581

शिवडी                 – 2460

अंधेरी प.              – 1822

अंधेरी पू.              – 1510

दिंडोशी                – 1530

गोरेगाव               – 1805

दहिसर                 – 2191

वर्सोवा                 – 1298

जोगेश्वरी पू.          – 2887

मागाठाणे             – 2818

वांद्रे पू.                 – 1912

वांद्रे प.                 – 1678

विलेपार्ले              – 2255