अकबर रोड नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग; दिल्लीत शिवप्रेमी तरुणांचे आंदोलन

दिल्लीतील अकबर रोडचे नाव बदलण्याची मागणी सातत्याने होत आहे. ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुघलांबाबत लोकांच्या मनात एक संताप दिसून येत आहे. यातूनच दिल्लीतील शिवप्रेमी तरुणांनी आंदोलन करत अकबर रोड नावाच्या फलकाला काळे फासत छत्रपती शिवाजी मार्ग असे या रस्त्याचे नामकरण केले. शुक्रवारी रात्री छावा चित्रपट पाहून घरी जात असताना अकबर रोड येथे दिल्लीतील मुघलकालीन रस्त्यांची नावे बदलण्यासाठी तरुणांनी हे आंदोलन केले.