Forbes- शाहरुख, सलमान किंवा आमिर खान नाही तर, या बॉलीवूड सेलिब्रिटीने फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले; वाचा सविस्तर

शाहरुख, सलमान किंवा आमिर खान नाही तर, या बॉलीवूड सेलिब्रिटीने फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ती व्यक्ती आहे उद्योजक रॉनी स्क्रूवाला यांनी फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. रॉनी स्क्रूवाला हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांची संपत्ती एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

 

फोर्ब्सच्या यादीनुसार, या उद्योजकाची एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलर्स आहे. यामुळे रॉनी स्क्रूवाला हे तीन बॉलीवूड सुपरस्टार – शाहरुख खान ($770 मिलियन, सलमान खान ($390 मिलियन) आणि आमिर खान ($220 मिलियन) यांच्या एकत्रित एकूण संपत्तीपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. या तिघांच्या संपत्तीची टोटल ही एकूण 1.38 अब्ज डॉलर्स इतकी  आहे.

 

मुंबईत जन्मलेल्या रॉनी स्क्रूवाला यांनी 1970 च्या दशकात टूथब्रश बनवून आपल्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात केली. 68  वर्षीय रॉनी स्क्रूवाला यांनी मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्स पदवी देखील घेतली आहे. 1990 मध्ये, रॉनी स्क्रूवाला यांनी यूटीव्ही सुरू केले, ज्याचे नंतर यूटीव्ही मोशन पिक्चर्स असे नामकरण करण्यात आले. कंपनीने पुढील 2 दशकांत प्रतिष्ठित चित्रपटांची निर्मिती केली. त्यापैकी ‘स्वदेस’, ‘रंग दे बसंती’, ‘खोसला का घोसला’, ‘जोधा अकबर’, ‘फॅशन’, ‘दिल्ली बेली’ आणि ‘बर्फी’ होते.

यूटीव्ही मोशन पिक्चर्सने निर्मित केलेले टीव्ही शो शांती, हिप हिप हुर्रे, शाका लाका बूम बूम, खिचडी आणि शरारत होते. फोर्ब्सच्या वृत्तानुसार, त्यांनी 2012 मध्ये यूटीव्हीमधील त्यांचा हिस्सा वॉल्ट डिस्ने कंपनीला 450 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीत विकला आणि भारतातील युनिटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. रॉनी स्क्रूवाला हे मुंबईस्थित एडटेक फर्म अपग्रॅडचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष देखील आहेत.