मस्क यांच्या कंपनीकडून ईव्हीएम तपासा

आयोगाकडून निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती केलेली असते. त्यांच्याकडून मतमोजणी दरम्यान नक्कीच आकडय़ांचा खेळ होऊ शकतो. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेत शिवसेना उमेदवार अमोल कीर्तीकर यांना सुरुवातीला विजयी घोषित केले होते. मात्र त्या ठिकाणच्या निवडणूक अधिकाऱयांना कुणाचा तरी फोन आला आणि नंतर आकडे बदलले, असा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात एलॉन मस्क यांच्या कंपनीतील तज्ञ बोलावून ईव्हीएमची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.