‘प्रातःस्वर’ मैफलीत नूपुर गाडगीळ यांचे गायन

शास्त्रीय संगीताच्या सुरेल रागांना वाहिलेल्या ‘पंचम निषाद’च्या ‘प्रातःस्वर’ मैफलीत नूपुर गाडगीळ यांच्या सुमधुर गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. तबला साथ तनय रेगे आणि तर संवादिनी साथ ज्ञानेश्वर सोनावणे याची असेल. ही मैफल रविवार, 6 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता कलांगण, रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. मैफलीच्या माध्यमातून संगीतप्रेमींना सकाळच्या रागांचे स्वरूप शांत, मनोहर आणि आत्मीय वातावरणात अनुभवण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.