वैष्णोदेवी मंदिर परिसरात मांसाहारावर बंदी

कटरा ते त्रिकूट पर्वतावरील वैष्णोदेवी मंदिरापर्यंत जाणाऱ्या 12 किलोमीटरपर्यंतच्या मार्गात आणि आसपासच्या क्षेत्रात मांसाहारावर दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. मद्यविक्रीवरही बंदी असेल. कटराच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. याशिवाय मंदिरापासून दोन किलोमीटरच्या परिघात येणाऱया अरली, हंसाली आणि मटयाल या गावांतही हा आदेश लागू असणार आहे. कटरा-जम्मू रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या 200 मीटरपर्यंतच्या पुंद्रोरियन, कोटली बजालियान, नोमाइन आणि मघाल गावातही मद्यविक्री आणि मांसाहारासाठी बंदी असणार आहे.