सांताक्रूजमध्ये परप्रांतीयाकडून मराठी तरुणाला मारहाण, नर्सरीचे दुकान लावण्यावरून वाद

सांताक्रूजमध्ये एका परप्रांतीयाने मराठी तरुणाला मारहाण केली आहे. या मराठी तरुणाने सांताक्रूजमध्ये नर्सरीचे दुकान सुरू केले होते. पण इथे दुकान लावू नको म्हणून अशी धमकी या परप्रांतीयाने दिली. मराठी तरुणाने त्याच्या धमकीला न घाबरता दुकान सुरू ठेवलं. यावरून या परप्रांतीयाने मराठी तरुणावर हल्ला केला.

सांताक्रूजमध्ये मुंबई विद्यापीठ परिसरात अनेक झाडांची नर्सरीची दुकानं आहेत. इथे अनेक परप्रांतीयांनी अवैधपद्धतीने ही दुकानं सुरू केली आहेत. एका मराठी तरुणानेही नर्सरीचे दुकान थाटले. तेव्हा एका परप्रांतीय व्यक्तीने या मराठी तरुणाला हटकलं. तसेच इथे दुकान लावू नको म्हणून धमकी दिली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या मराठी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी परप्रांतीय आणि आणि तरुणाविरोधातही गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना समजावून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसानंतर या परप्रांतीय व्यक्तीने या मराठी तरुणाला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. या परप्रांतीय व्यक्तीने तरुणाला इतकं मारलं की तो रक्तबंबाळ झाला आहे.