टेस्ला कंपनीचे सीईओ, उद्योगपती एलन मस्क यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. यूरोपीय संसदेचे स्लोवेनियाई सदस्य ब्रांको ग्रिम्स यांनी ही माहिती दिली. 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी एलन मस्क यांचा अर्ज नॉर्वेजियन नोबेल समितीकडे सादर करण्यात आल्याचे ते म्हणाले. ग्रिम्स यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, मस्क यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवधिकार कार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे नामांकन करण्यात आले आहे. नोबेल पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख 1 फेब्रुवारी आहे.