मालाड-गोरेगाव पश्चिममध्ये आज पाणी नाही

मालाड पश्चिम येथील लिबर्टी जलबोगदा येथे 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती सुरू झाली आहे. जलवाहिनीची दुरुस्ती शुक्रवार 24 जानेवारीला रात्री साडेदहापासून शनिवार 25 जानेवारीपर्यंत सकाळी 8 पर्यंत केली जाणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम येथील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे.

या विभागात पाणीपुरवठा बंद
– मालाड पश्चिम – अंबुजवाडी, आझमीनगर, जनकल्याणनगर
– गोरेगाव पश्चिम – उन्नतनगर, बांगूरनगर, शास्त्राrनगर, मोतीलालनगर, सिद्धार्थनगर, जवाहरनगर, भगत सिंगनगर, राम मंदिर मार्ग.