पाकिस्तानशी क्रिकेटचे सर्व संबंध तोडा, सौरव गांगुलीने BCCIकडे केली मागणी

हिंदुस्थानने पाकिस्तानशी असलेले सर्व क्रिकेट संबंध तोडावेत आणि आयसीसी आणि आशियाई स्पर्धांमध्येही त्यांच्यासोबत खेळू नये, अशी मागणी हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने बीसीसीआयकडे केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संताप व्यक्त करत त्याने ही मागणी केली आहे.

सौरव गांगुली म्हणाला आहे की, “दर दुसऱ्या वर्षी हिंदुस्थानी भूमीवर काही ना काही दहशतवादी कारवाया घडत आहेत. आता हे सहन केलं जाऊ नये.” माध्यमांशी संवाद साधताना तो असं म्हणाला आहे. यावेळी पत्रकारांनी त्याला विचारले की हिंदुस्थानने पाकिस्तानसोबतचे क्रिकेट संबंध तोडावेत का? यावर तो म्हणाला, 100 टक्के, हिंदुस्थानने हे करायला हवे (पाकिस्तानशी संबंध तोडावे) आणि कडक कारवाई करावी.”