महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने स्वस्त

राज्यात 30 लाखांहून जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर घोषित करण्यात आलेला सहा टक्के कर मागे घेण्यात आला असून या वाहनांवर कोणताही कर लागणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्री आणि अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद सभागृहात दिली. तसेच आमदारांनाही ईव्ही वाहनांसाठीच्या कर्जावर सवलत देण्यात येईल.