थिएटरमधील धुम्रपानची जाहिरात बंद होणार

कोणत्याही थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी अभिनेता अक्षयकुमार याची धूम्रपानविरोधी जाहिरात दिसायची. ‘हीरोगिरी फू फू करने में नहीं…’ असं म्हणत मोठय़ा पडद्यावर येणारी ही जाहिरात आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थिएटरमध्ये आता ही जाहिरात दिसणार नाही. सेन्सॉर बोर्डाने तसे आदेश दिले आहेत.

हॉस्पिटलबाहेर सिगारेट फुंकत उभ्या असलेल्या नंदूला अक्षयकुमार धूम्रपान करू नकोस म्हणून सांगतो. अक्षयकुमार  महिलांच्या मासिक पाळीसाठी लागणारे सॅनिटरी पॅड त्याच्या हातात देतो. अक्षय नंदूला समजावतो की, सिगारेटचे पैसे वाचवून सॅनिटरी नॅपकीन खरेदी करून पत्नीला मासिक पाळीत घाणेरडे कपडे वापरल्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपासून वाचवू शकतो. सहा वर्षे ही जाहिरात थिएटरमध्ये चालली. ती आता काढून टाकण्यात आली आहे. त्या जागी एक नवीन जाहिरात येणार असल्याचे समजते. ज्यामध्ये तंबाखू, धूम्रपान करणे हानीकारक असल्याचे सांगण्यात येईल.