
आंतरधर्मीय लग्न आणि धर्मांतराबाबत बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अखेर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, आम्ही एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतो आणि समजून घेतो तसेच झहीर त्याच्या परंपरांचे पालन करतो. आम्ही कधीच धर्माबद्दल चर्चा केली नाही. मी माझ्या घरातील परंपरांचे पालन करते. झहीर दिवाळीच्या पूजेला बसतो, असे सोनाक्षीने सांगितले. सोनाक्षी आणि झहीर यांनी 23 जून 2024 रोजी लग्न केले.