
फडणवीस आणि कंपनीकडून गंडवागंडवी सुरूच आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान’ योजनेचा आर्थिक बोजा सरकारवर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱयांना आज तरी कर्जमाफी देणे शक्य नाही. उद्या काय होईल, हे सांगता येणार नाही,’ असे आज फडणवीस सरकारमधील मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. भरणे यांच्या या विधानानंतर शेतकऱयांमधून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अजितदादांना दोष देऊ नका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच महायुतीच्या इतर प्रमुख नेत्यांनीही शेतकऱयांना तूर्त कर्जमाफी मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकटय़ा अजित पवारांना दोष देणे योग्य होणार नाही, असेही भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सरकारविरोधात संताप
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱयांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कर्जमाफी मिळाली नाही. आता सगळेच मंत्री हात वर करत आहेत.