रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डात किमतीच नाहीत

जगातील अनेक राष्ट्रांमध्ये महागाईचा वाढली आहे. सीरीया देशात तर महागाईचा कहर आहे. याचा परिणाम म्हणजे सीरीयातील हॉटेलमध्ये मेन्यूकार्डात डिशेसच्या किमतीच लिहीत नाहीत. एक प्लेट खाण्यासाठी नोटांचे बंडल द्यावे लागते. एलोना काराफिन नावाची एक ट्रॅव्हल कंटेंट क्रिएटर आहे. नुकतीच तिने सीरीया देशाला भेट दिली. त्यावर तिने व्हिडीयो केला आहे. एक कप कॉफीसाठी 25 हजार सीरीयन पाऊंड द्यावे लागतात, असेही एलोनाने सांगितले.