
भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी आपली घटनाच अशी लिहिली आहे ज्यामुळे देशावर कितीही आघात झाले तरी देश एकसंधच राहील. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये बदल आणून त्या देशातील घटनेवर आघात होत राहिले पण भारत हा एकमेव देश कि कितीही संकटं आली, कितीही दबाव आला तरीही देशाच्या संविधानाने देश एकसंध ठेवला. त्यामुळे हा देश एकसंध ठेवण्याचं श्रेय कुणाला जात असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं. बाबासाहेबांनी आपली घटनाच अशी लिहिली आहे की, हा देश कितीही आघात झाले तरी एकसंधच राहील, जगातील कोणतीही शक्ती ह्या देशाला दुर्बल करू शकणार नाही. राज्यकर्ते येतील – जातील पण लोकशाहीचा मार्ग हा कुणालाच सोडता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते मुंबईतील संविधान गौरव सोहळा कार्यक्रमात बोलत होते.
अनेकदा काही निर्णय घेतले गेले आणि कालांतराने मागे घ्यावे लागले. आणीबाणीचा निर्णय घेतला गेला. तेव्हा लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारं इंदिरा गांधींसारखं नेतृत्व आणीबाणीच्या माध्यमातून संविधानावर आघात करतंय असं जाणवताच जनतेने भूमिका घेतली आणि तेव्हा इंदिरा गांधींनाही पराभवाला सामोरं जावं लागलं असेही ते म्हणाले.
आपण कुठेही असोत, कुठल्याही राजकीय पक्षाचे असोत, संघटनेचे असोत पण आपण एका गोष्टीसंबंधीचा निकाल घेतला पाहिजे की, आम्ही काहीही गोष्टी मान्य करू पण संविधानाचं रक्षण ह्यात तडजोड होणार नाही. ते संविधान आणि त्याचं महत्त्व हे समजण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत संविधान, संविधानाचा विचार, संविधानाचं योगदान व निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कष्ट हा देश कधी विसरणार नाही असंही शरद पवारांनी म्हटलं.
संविधान हक्क परिषद व सा. मंत्रालय वार्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संविधान गौरव सोहळा व सा. मंत्रालय वार्ता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ ह्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो व उपस्थितांशी संवाद साधला.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांतजी हंडोरे, हा सोहळा… pic.twitter.com/ktGjkNKFNE
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2025
याबाबत एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, विधान हक्क परिषद व सा. मंत्रालय वार्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संविधान गौरव सोहळा व सा. मंत्रालय वार्ता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ ह्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो व उपस्थितांशी संवाद साधला.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांतजी हंडोरे, हा सोहळा ज्यांनी अतिशय कष्टाने आयोजित केला त्या निशाताई भगत, अनिल अहिरे, व्यासपीठावरील अन्य सर्व मान्यवर आणि सहकारी बंधू भगिनींनो…
आपण मला माफ करा कारण माझा जरा घसा बसला आहे, त्यामुळे कदाचित आवाजात स्पष्टता जाणवणार नाही. आजचा हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. संविधानावर ज्यांची निष्ठा आहे त्यांच्या गौरवाचा, सन्मानाचा असा हा सोहळा. संविधानाचा विचार ह्या देशात राहावा अशी जी भावना आहे ती जपण्यासाठी, तुमच्यामधले सार्वजनिक जीवनातील जे कार्यकर्ते असतील त्यांच्या सेवेसंदर्भात गौरव करण्यासाठी कार्यक्रम घेण्याची भूमिका निशाताई आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी घेतली.
हा देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर राष्ट्र उभारणीसाठी अमलात आणलेल्या संविधानाचा आदर आपल्या सर्वांना आहे. पण त्या संविधानात नमूद केलेले सर्व हक्क आणि न्याय सामान्य माणसाला मिळालेच आहेत असा दावा करता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत मोलाचा काळ संविधाननिर्मितीसाठी दिला. हे सर्व काम दोन टप्प्यात झालं. एक टप्पा स्वातंत्र्याच्या आधीचा तर दुसरा टप्पा स्वातंत्र्यनंतरचा. ह्या देशात प्रारंभी सर्वपक्षीय सरकार स्थापन झालं होतं आणि त्या सरकारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदे आणि न्याय मंत्री होते, विद्युत निर्मिती मंत्री होते, जलसंधारण मंत्री होते. त्यांनी एक मोठं काम केलं. ते मोठं काम म्हणजे आज पण प्रगतीच्या दिशेने वीज आणि पाणी ह्या विषयांना अतिशय प्राधान्य देतो. पण ह्या विषयांसंबंधीची धोरणी सुरुवात हि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपल्या देशात केली. आज पंजाब असो, हरियाणा असो… ९८% क्षेत्र ओलिताखाली आहे, त्यामुळे ह्या देशातील जनतेची अत्यंत महत्त्वाची गरज त्यांनी भागवली. हे कशामुळे झालं ? तर भाक्रा नांगल नावाचं एक धरण झालं. ह्या धरणाचा निर्णय केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून कुणी घेतला असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी घेतला होता. एवढं मोठं धरण त्यांनी बांधलं आणि अशी अनेक धरणं व्हावीत ह्याचीही व्यवस्था केली. त्या धरणांमधून गावाला, शेतीला पाणी दिलं आणि त्यामधूनही वीज तयार केली म्हणजेच सर्वांगाने समाजातील अंधःकार दूर करण्याचं मोलाचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच करून ठेवलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. त्यांच्याकडे संविधाननिर्मितीची जबाबदारी दिली गेली.
आपण आज बघतो आहोत कि, आज हिंदुस्थानच्या आजूबाजूच्या देशांची परिस्थिती काय आहे? श्रीलंका पहा, तिथे लष्करशाही आली. पाकिस्तान, चीन बघा, तिथे हुकूमशाही आली. बांगलादेशची परिस्थिती बघा, तिथेही लष्कराचं राज्य आलं. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये बदल आणून त्या देशातील घटनेवर आघात होत राहिले पण भारत हा एकमेव देश कि कितीही संकटं आली, कितीही दबाव आला तरीही ह्या देशाच्या संविधानाने देश एकसंध ठेवला. त्यामुळे हा देश एकसंध ठेवण्याचं श्रेय कुणाला जात असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं. बाबासाहेबांनी आपली घटनाच अशी लिहिली आहे कि, हा देश कितीही आघात झाले तरी एकसंधच राहील, जगातील कोणतीही शक्ती ह्या देशाला दुर्बल करू शकणार नाही. राज्यकर्ते येतील – जातील पण लोकशाहीचा मार्ग हा कुणालाच सोडता येणार नाही. अनेकदा काही निर्णय घेतले गेले आणि कालांतराने मागे घ्यावे लागले. आणीबाणीचा निर्णय घेतला गेला. तेव्हा लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारं इंदिरा गांधींसारखं नेतृत्व आणीबाणीच्या माध्यमातून संविधानावर आघात करतंय असं जाणवताच जनतेने भूमिका घेतली आणि तेव्हा इंदिरा गांधींनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. पुन्हा देश सावरण्यासाठी जेव्हा इंदिरा गांधींनी पुढाकर घेतला तेव्हा ह्या देशात भूतकाळातील ती भूमिका पुन्हा घेणार नाही, लोकशाही चुकीच्या रस्त्यावर जाऊ देणार नाही असा शब्द त्यांना देशाला द्यावा लागला. तेव्हापासून आजपर्यंत संविधानानेच हा देश चाललेला आहे.
आपण कुठेही असोत, कुठल्याही राजकीय पक्षाचे असोत, संघटनेचे असोत पण आपण एका गोष्टीसंबंधीचा निकाल घेतला पाहिजे कि, आम्ही काहीही गोष्टी मान्य करू पण संविधानाचं रक्षण ह्यात तडजोड होणार नाही. ते संविधान आणि त्याचं महत्त्व हे समजण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत संविधान, संविधानाचा विचार, संविधानाचं योगदान व निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कष्ट हा देश कधी विसरणार नाही.
मला आनंद आहे कि, ज्येष्ठ गायिका निशाताई भगत असोत, ॲड. अनिल अहिरे आहोत आणि त्यांचे सर्व सहकारी असोत ह्यांच्या प्रयत्नांतून हाच विचार जपला जात आहे आणि तो विचार जपण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही अखंडपणे करत राहू ह्या भावनेने एकप्रकारची जनजागृती करणं, लोकांमध्ये त्या विचाराचं महत्त्व पटवून देणं हा कार्यक्रम महाराष्ट्रात ते बरेच दिवस त्यांच्याकडून सुरु आहे. मला आनंद आहे कि, आज हा कार्यक्रम तुमच्या आणि माझ्या साक्षीने ह्याठिकाणी संपन्न होत आहे. हा कार्यक्रम मी स्वीकारला पण वेळेचा ताळमेळ बसत नव्हता पण एक विचार पक्का होता कि काहीही झालं तरी संविधान गौरवाचे, सन्मानाचे असे कार्यक्रम गरजेचे आहेत. म्हणून आग्रहाने हा कार्यक्रम घेतला गेला आणि मीही आवर्जून उपस्थित राहिलो. कारण डॉ. बाबासाहेबांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहचविण्यासाठी, त्यांचं हित जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ह्याबद्दल माझ्या काय कुणाच्याच मनात शंका नाही.
सर्वात आनंदाची गोष्टी अशी कि, तुमच्यापैकी अनेकांचा ह्याठिकाणी सन्मान झाला. कशासाठी? तुम्ही गावात काम करत असाल, मोहल्ल्यात काम करत असाल, एखाद्या शहरामध्ये काम करत असाल, कुठेही काम करत असाल, भले तुम्ही पदाधिकारी असो – नसो, आमदार असो – नसो… पण तुम्ही जनतेसाठी कष्ट करताय म्हणून त्या कष्टाची नोंद निशाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतली आहे. म्हणून ह्या कार्यक्रमाच्या आयोजकांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र !, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.