जेव्हा प्रियजनांना सोडायला तुम्ही एअरपोर्टवर जाता, तेव्हा आपण त्यांना प्रेमाचा निरोप देतो, गळाभेट घेतो आणि हॅप्पी जर्नी बोलतो. कधी कधी ही गळाभेट, निरोपाचा संवाद लांबतो. मात्र आता तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिठी मारून निरोप देता येणार नाही. न्यूझीलंड एअरपोर्टवर तसा फलक लागला आहे. ‘जर मिठी मारून निरोप द्यायचा असेल, तर पार्किंगचा वापर करा. नियमानुसार एअरपोर्टवर फक्त तीन मिनिटे मिठी मारून भेटू शकता, अन्यथा दंड भरा.’ असा फलक न्यूझीलंडच्या डुनेडिन एअरपोर्टवर लागला आहे.
विमानतळावरील प्रेमाच्या निरोपासंदर्भात न्यूझीलंड एअरपोर्टने केलेल्या नियमामुळे जगभरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच नाराजी व्यक्त होतेय. एअरपोर्ट म्हणजे भावनांचे सेंटर. एअरपोर्टवर प्रियजनांना निरोप देताना लोक भावुक होतात. नव्या नियमामुळे प्रवाशांनी नाराज होऊ नये, असे डुनेडिन एअरपोर्टचे सीईओ डॅनियल डी बोनो यावेळी म्हणाले.