
दिव्यांगांकडे प्रमाणपत्र नसेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) भरतीमध्ये त्याला प्रवेश मिळणार नाही. दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील सर्व दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून वितरित होणारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि यूडीआयडी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व भरती प्रक्रियेत 1 मे 2025 पासून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीत दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांच्या खात्यात यूडीआयडी कार्ड क्रमांक नोंदविण्याची व त्यास ‘स्वावलंबन पोर्टल’वरून वैधता मिळविण्याची सुविधा आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.