
सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेबाबत कुठल्याही प्रकारच्या प्रस्तावावर सरकार विचार करणार नाही. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत स्पष्ट केले. निवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या जागा घटवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असेही ते म्हणाले. या प्रकरणी एखादा प्रस्ताव सरकारकडे आला आहे का, असा सवाल त्यांना विचारला असता असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे ते म्हणाले.