IND Vs AUS नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक, 21 व्या वर्षी रचला इतिहास; वडिलांना अश्रू अनावर

टीम इंडिया व ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी नवोदित फलंदाज नितीश रेड्डीने दमदार शतक झळकावत संघाला सावरले. नितीशने त्याच्या कारकि‍र्दीतले पहिले कसोटी शतक झळकावले आहे. त्याने 173 चेंडूनत 10 चौकार व एका षटकारासह आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण करताच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भावनिक क्षणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.