
हायवेवर प्रवास करताना टोलवसुली केली जाते. काही वेळा वाहनचालकांकडून दोनदा टोल कापला जातो. 2024 मध्ये जवळपास साडेबारा लाख प्रवाशांकडून दोनदा टोलवसुली करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. 12.55 लाख लोकांना याप्रकरणी रिफंड देण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. जर कोणतीही टोल एजन्सी चुकीच्या पद्धतीने टोल वसुली करताना आढळल्यास त्या एजन्सीवर वाहनचालकाच्या शुल्काच्या अतिरिक्त 1500 पट दंड आकारला जाऊ शकतो. 2024 मध्ये चुकीच्या पद्धतीने टोल वसुली करण्यात आल्याने 12.55 लाख प्रवाशांना रिफंड देण्यात आला आहे. यावर्षी एकूण 410 कोटी फास्टटॅगमधून ट्रान्झॅक्शन झाले आहे. ज्यात चुकीच्या पद्धतीने कपात केलेली रक्कम केवळ 0.03 टक्के आहे. ज्या टोल एजन्सीने चुकीच्या पद्धतीने टोल वसूल केला आहे
कोणाला मिळाला रिफंड?
चुकीच्या पद्धतीने कापण्यात आलेल्या प्रवाशांना टोलचा रिफंड देण्यात आला आहे. 2024 मध्ये असे 5 लाखांहून अधिक प्रकरणांत टोल रिफंड करण्यात आला आहे. याशिवाय, 4.45 लाख प्रकरणांत फास्टटॅग यूजर्सच्या ट्रान्झॅक्शनची व्यवस्थित ओळख झाली नाही. 1.36 लाख डुप्लिकेट ट्रान्झॅक्शन झाले. 1.25 लाख प्रवाशांना परतीचा लाभ मिळाला नाही. 47 हजार प्रकरणात दुसऱ्या पद्धतीने पे करण्यात आले. जर कोणत्याही वाहनांना विना टोल पार करताच टोल वसूल करण्यात आला तर त्या टोल एजन्सीकडून एक लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. एनएचएआयकडून टोल फ्री नंबर 1033 कडून चुकीच्या पद्धतीने कापलेल्या टोलची मासिक माहिती घेतली जाते. एनएचएआयने दिलेल्या माहितीनुसार, टोल प्लाझावर चुकीच्या पद्धतीने टोल वसूल केल्यामुळे गेल्या दोन वर्षांत 14 टोल वसुली एजन्सीजना ब्लॅकलिस्ट करण्यात आले.